Poem (बाबांच्या कविता)

1. माझी साऊ (सावणी)

आठवते आज तुझे कळीसारखे बालपण
तुझ्या गोड आठवणीची करतो आहे साठवण

नटा पट्टा करणारी लाडकी माझी सावणी
बघता बघता झाली की अवघ्या जगण्याची सावली

लाली, पावडर, दोन वेण्या, थिपक्या थिपक्या चा झगा
एका हातात आइसक्रीम, एका हातात फुगा.

म्हणायची आईला मारू नकोस हा ओरडेल .
नुसता हात लावला ना तरी बाबांना सांगेल

गेले कित्तेक दिवस तुला बाबाच नाही आठवत.
की इच्छा असूनही तुला कोणी माझ्याकडे नाही पाठवत.

नजरेआडच्या बाबांना फक्त एकदा भेटशील ?
दुरावलेल्या बाबांसाठी धावत पळत येशील ?

2. डोळ्यात न दाखवता जो प्रेम करतो त्याला बाबा म्हणतात

लहान असल्यापासून आई मुलांना संगत असते.

इथे जाऊ नको बाबा मारेल..
तिथे जाऊ नको बाबा मारेल..
झाडावर चढू नको बाबा मारेल..
नदीवर जाऊ नको बाबा मारेल..
शाळेत जा नाहीतर बाबा मारेल..
हे करू नको नाहीतर बाबा मारेल..
ते करू नको नाहीतर बाबा मारेल..

म मुले सुद्धा बाबांना घाबरतात.
बाबांनी मारू नये म्हणून शाळेत जातात.
बाबांनी मारू नये म्हणून अभ्यास करतात.
बाबाच्या दहशतीखाली शिकत राहतात.
हळू हळू मूल बाबांकडे दुर्लक्ष करून आईवरच प्रेम करू लागतात.

मनामधून बाबांना काढून टाकतात.
आईच्या चरणावर्ति सर्वस्व अर्पण करतात.
बाबांपासून चार हात लांबच राहतात,
मूल आईच गान गातात, मूल आईवर कविता करतात

कोणतच मूल बाबांना दुधावरची साय म्हणत नाही.
लंगड्याचा पाय म्हणत नाही, वासराची गाय म्हणत नाही .

बाबांसाठी मुलांकडे शब्दच नसतात. .

मुलांचा पायाला ठेच लागली तरी बापरे म्हणत नाही.
आणि साणे गुरुजीनाही श्याम चा बाप दिसत नाही .

आई घरात असली की कसं घर भरल्यासारख वाटत .
बाबा घरात असले की मात्र स्मशान शांतता.
मुले शपत सुद्धा आईची घेतात.
बाबा शपतेच्याही लायकीचा नसतो .

बाबा असतो केवळ मुलांचा नावाच्या आणि आडनावाच्या मध्ये, नावापुरता..

मूल विठोबाला माऊली म्हणतात,
धर्तीला माय म्हणतात
आणि देशाला माता म्हणतात.

बाबा मात्र धरणीतून, देशातून आणि मुलांच्या मनातून तेव्हाच झालेला असतो हद्दपार
बाबा असतो कठोर, काळीज नसलेला, निर्दय, मारकूटा.
बाबा असतो मुलांच्या स्वप्नात येणारा बाबूल बुवा.

बाबा म्हणजे केवळ पैसे रुपये कमवण्याचे यंत्र.
तेवढे काम त्याने केले की त्याचे कर्तव्य संपते.
पण असे असूनही बाबा मेल्यावर मुलांच्या छातीत धडकी का भरते.

का उगळतो मुलांच्या डोळ्यातून पाऊस,
का वाटते मुलांना पायाखालची जमीन सरखल्या सारखी
का वाटते मुलांना की आपण बेवारस झालो म्हणून .
का हुंबरतात मुले बाबा मेल्यावर
का मूल घाबरतात बाबा मेल्यावर

कथा कादंबऱ्या मध्ये आणि कावितेत कधीही नसलेला हा पथर दिल बाबा,
प्रेतएक्षांत जेव्हा नसलेला होतो तेव्हा का वाटत मुलांना, की

की डोळे मिटून जी प्रेम करते तिला प्रियसी म्हणतात.
डोळे उघडे ठेऊन जी प्रेम करते तिला मैत्री म्हणतात .
डोळे वाटारून जी प्रेम करते तिला पत्नी म्हणतात .
आणि स्वतचे डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते तिला आई म्हणतात .
पण ..
डोळ्यात न दाखवता जो प्रेम करतो त्याला बाबा म्हणतात .