लॉकडाऊन – फोन पे चर्चा

Lock down telephonic discussion

नमस्कार स्वीट फॅमिली मेंबर!

आज काल सर्वच जन लॉकडाऊन मुळे घरी बसून बोर होत असतील! यात काहीही शंकाच नाही. जर घरी बसून बोर झाल्यापेक्षा काहीतरी आपल्या ज्ञानात काही भर टाकली तर कसे असेल ?

मी पण असाच खूप बोर झालो होतो, आणि विचार करता करता एक कल्पना सुचली, की ज्या मोबाइल फोन मुळे सगळीच लोक दूर दूर झाली, त्याच मोबाइल चा उपयोग करून सर्वाना एकत्र आणले तर कसे असेल, बरोबर की नाही?

जसे की आजकाल फोन वर बोलायला पूर्वी सारखे एसटीडी किवा आयएसडी सारखे जास्त काही पैसे लागत नाहीत. तरीही आपणही कधी आपल्या मित्राना, नातेवाईकांना जास्त फोन लावत नाही (गर्ल फ्रेंड सोडून) ,आणि जर केला तर जास्त बोलातही नाही.

माझी कल्पना अशी आहे की, माझे एक मित्र आहे, जे एका कॉलेज मध्ये प्रोपेसर आहेत. त्यांच्याकडे खूप सारे महापुरुषांचे जसे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे, महात्मा जोतिबा फुलेनचे, छत्रपती शिवाजी महाराजांचे, छत्रपती शाहू महाराजांचे असे खूप साऱ्या महापुरुषयांचे नॉलेज आहे. त्याची ओळख आपण चर्चेमध्ये करणार आहोत.

काल माझ्यात आणि त्यांचा १ तास कॉल चर्चा चालू होता, त्यांनी खूप सारी माहिती मला दिली, आमचा कॉल संपता संपत नव्हता, १ तास कसा संपला कळलेही नाही.

त्यांनी देलेली माहिती मला खूप आवडली. आणी मला ही लॉकडाऊन – फोन पे चर्चा ची कल्पना सुचली आणि मी विचार केला की, हीच माहिती जर माझ्या नातेवाईक, समाज बांधव आणि मित्र मंडळी ना पण भेटली तर त्यांच्या ज्ञानात काही भर पडेल. आणी माझ्या हातून एक छोटेसे समाज कार्य ही घडेल. असे मला वाटते.

म्हणून जर कोणीही माझे नातेवाईक, समाज बांधव, मित्र मंडळी जर इच्छित असेल, आपल्या ज्ञानात भर टाकण्यासाठी कीवा समाजाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तर आपण त्यांच्या सोबत कॉन्फरन्स कॉल घेऊन ग्रुप ने चर्चा करू शकतो आणि चर्चा करत असताना आपणही आपले मत मांडू शकतात किवा आपले प्रश्न विचारू शकतात.

कॉन्फरन्स कॉल मध्ये चर्चा करण्यासाठी माझ्या नंबर वर कळवा, मी तुम्हाला कॉन्फरन्स कॉल मध्ये कॉल करेल .

बघा जर आवडले तर ही कल्पना..!

लॉकडाऊन फोन पे चर्चेचा पहिला विषयाची माहिती खालीलप्रमाणे

विषय : फुले, शाहू, आंबेडकर चळवळ म्हणजे नेमके काय ?

वेळ : ०३ मे २०२० रोजी संध्याकाळी ७:०० वा
चर्चेचा कालावधी : १५ ते २० मिनिटे (वेळ वाढू पण शकते, जर आपले प्रश्न मांडले तर )

धन्यवाद..!